अवैध तलवारीसह एक गजाआड – 15 दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजुरा : शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राजुरा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक मोहीम राबवली आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 3.30 ते 4.00 वाजण्याच्या सुमारास के. डी. फूड जंक्शन जवळील गल्लीत पोलिसांनी छापा टाकत एक धारदार अवैध तलवार जप्त करत मारोती शंकर तग्रपवार (वय 32, रा. चुनाभट्टी वॉर्ड) याला अटक केली.
तपासाची दिशा:
गुप्त माहितीच्या आधारे डी. बी. पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून 84 सें.मी. लांब लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली असून ती अवैधरीत्या बाळगलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी पो.उप.नि. भीष्मराज सोरते यांनी तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध गु. र. क्र. 352/2025 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
15 दिवसांत दुसरी कारवाई:
राजुरा शहरात अवैध शस्त्रसाठ्यावर ही 15 दिवसांतील दुसरी मोठी कारवाई असून पोलिसांच्या दक्षतेचे हे उदाहरण ठरले आहे.
कारवाईतील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी:
पोलीस निरीक्षक – सुमित परतेकी, पो.उप.नि. – भीष्मराज सोरते, पो.कां. – किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवाड, अविनाश बांबोळे, राजीव दुबे
राजुरा पोलिसांकडून स्पष्ट इशारा – गुन्हेगारीला स्थान नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत