Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प घेण्यात आला

प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प घेण्यात आला

महा घडामोडी न्यूज नेटवर्क हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी जिवती:- जिवती तालुक्यातील शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि.२९ ऑगस्ट रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प मध्ये दहा (१०) कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या डॉ.प्रकाश नगराळे सर सर्जन यांनी शस्त्रक्रिया केल्या . प्राथमिक आरोग्य केंद्र सेनगाव येथील डॉ.सुखदेव करेवाड वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र शेणगाव तसेच डॉ.अर्पण झुरे वैद्यकीय अधिकारी फिरते आरोग्य पथक भारी त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक प्रविन खांडरे आरोग्य सहा‌‌य्यिका वनिता तोडाशे सिस्टर आरोग्य सेविका सुरणकर सिस्टर देवगडे सिस्टर भगत सिस्टर भालेराव सिस्टर उपस्थित होते. तसेच नामदेव जाधव, अक्षय केजगीर प्रियंका झाडे प्रेम राठोड व इतर स्टाफ उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत