भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली; महिला जागीच मृत, दोघांची प्रकृती गंभीर
भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली; महिला जागीच मृत, दोघांची प्रकृती गंभीर
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राजुरा–गोविंदपूर–आदिलाबाद मार्गावरील लालघोडा फाटा येथे भीषण अपघात घडला. कोरपण्याहून गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट डिझायर (MH 40 BJ 7339) या गाडीस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या स्कॉर्पिओवर जोरदार आदळली.
ही धडक इतकी प्रचंड होती की वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघातात गाडीत बसलेली वैशाली कोचाडे (वय २५, रा. राजुरा) हिचा जागीच मृत्यू झाला, तर करण पंधरे (वय १७, शिवणी) व प्रेम कोवे (वय २२) हे दोघे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताचे तपशील आणि सावधगिरीचा संदेश
- अपघाताचे कारण भरधाव वेग आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
- गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
- अपघाताचे दृश्य पाहून राहिलेला त्रास आणि धक्का गावकऱ्यांना अजूनही जाणवत आहे.
सावधगिरीचा संदेश:
हा अपघात रस्त्यावरील वेग नियंत्रण, सावधगिरी आणि नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो. वाहन चालवताना वेगमर्यादा पाळणे, रस्त्याच्या कडा, पार्किंग आणि उभी वाहनांची जागा लक्षात ठेवणे हे केवळ तुमच्या जीवनासाठीच नव्हे तर इतरांच्या सुरक्षेसाठीही अनिवार्य आहे.
बातमी संकलन : रविकुमार बंडीवार, नांदा फाटा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत