Breaking News

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत लखमापूर, भोयगाव शाळांचा जलवा

तालुका स्तरीय १४ वर्षाखालील मुली-मुलांच्या स्पर्धेत प्रथम, दुसरे व तिसरे क्रमांक पटकावले

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, कोरपना : दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाच्या वतीने आयोजित तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत लखमापूरची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भोयगाव शाळा आणि राजेंद्र विद्यालय भोयगावच्या मुलींनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी प्रथम, दुसरे व तिसरे क्रमांक पटकावले असून, गावासाठी अभिमानाचा क्षण निर्माण केला आहे.

हायलाइट्स:

लखमापूर शाळा:

  • खुशी विनोद मुक्के – ४०० मीटर – प्रथम क्रमांक
  • प्रसन्ना अरुण भोयर – २०० मीटर – तृतीय क्रमांक
  • आलिया किशोर कोडापे – ६०० मीटर – तृतीय क्रमांक
  • ज्योत्सना संदीप मडावी – थाळी फेक – प्रथम क्रमांक

भोयगाव शाळा:

  • सानिया स्वराज ताजने – ४०० मीटर – तृतीय क्रमांक
  • राजेंद्र विद्यालय भोयगाव:
  • लीना गजानन घटे – २०० मीटर – तृतीय क्रमांक

विशेष सहकार्य:

मुलींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अंबुजा फाउंडेशनच्या CSR फंडने विशेष पाठिंबा दिला.

अभिनंदन आणि सन्मान:

तालुका गटशिक्षण अधिकारी, क्रेंद्र प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, अंबुजा फाऊंडेशनचे शिक्षण विभाग प्रमुख समन्वयक सरोज आंबागडे, शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीने विजेत्या मुलींना उत्कृष्ट कामगिरीसाठी अभिनंदन केले.

तसेच, मुलींना घडविण्यात क्रीडा शिक्षक निलेश कुमरे व सुरेश आलम, तसेच अंबुजा फाऊंडेशनचे क्रीडा व्यवस्थापक चैताली कन्नाके यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

शुभेच्छा आणि प्रेरणा:

मान्यवरांनी विजेत्या मुलींना आणि त्यांच्या शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मेहनतीला, खेळातील जोशाला व धैर्याला तालुक्यात व जिल्ह्यात गौरव मिळाला असून हा क्षण गावासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत