शिरूर तालुका शिवपाणंदचा राज्यात कळस रचणार - शरद पवळे (शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, शिरूर : शिव पाणंद शेतरस्ता चळवळ राज्यभरात जोमाने कार्यरत असून, शिरूर तालुक्यात या चळवळीने नवा आदर्श निर्माण केला आहे. शिरूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तालुक्यातील १०५ शेतरस्ते खुले करण्याचे आदेश देत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. या पुढाकारामुळे शिरूर तालुका राज्यभरातील आदर्श तालुका ठरत आहे.
पिंपरखेड गावातील सर्वे नंबरवरील महत्त्वाचा शेतरस्ता शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे समन्वयक बाळासाहेब बोंबे आणि स्थानिक शेतकरी बांधवांच्या संयुक्त प्रयत्नातून खुला करण्यात आला. हा उपक्रम चळवळीचे प्रणेते अध्यक्ष माननीय शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
चळवळीच्या कार्यात समन्वयक अॅड. सुप्रिया साकोरे, विजय शेलार, पत्रकार रविंद्र खुडे, वाळके साहेब आणि शांताराम पानमंद यांनी मोलाची भूमिका बजावली. यापूर्वी पिंपरखेड गावातील दोन रस्ते या टीमच्या प्रयत्नांतून खुले करण्यात आले होते आणि त्या यशाचा आदर्श ठेवून हा रस्ता देखील खुला झाला. शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानण्यात आले.
यापुढे समन्वयातून जो शेतरस्ता खुला केला जाईल, त्या शेतकरी बांधवांचा चळवळीच्या वतीने सन्मान करण्यात येईल, असे कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत