Breaking News

१५ वर्षांच्या सेवेनंतर शीतलताई गुंड PSI पदी विराजमान; कुळधरण गावात सत्कार सोहळा उत्साहात

 १५ वर्षांच्या सेवेनंतर शीतलताई गुंड PSI पदी विराजमान; कुळधरण गावात सत्कार सोहळा उत्साहात

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, कुळधरण : पुणे पोलीस दलात तब्बल १५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या शीतलताई गुंड यांची PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदी निवड झाल्याने कुळधरण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शीतलताई गुंड यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील मुलींसाठी त्या प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता आपल्या मुलीला उच्च शिक्षण देऊन मोठे केल्याबद्दल त्यांचे वडील दादासाहेब गुंड आणि आई नंदाताई गुंड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सरपंच सुधीर जगताप, दिपाली गोविंद पवार, दीपक काकडे, जालिंदर माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावातून शीतलताई गुंड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

गावातील अनेक युवक-युवतींनी त्यांच्या यशातून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीकडे वळण्याची भावना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत