राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
9 मे रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 12694 प्रकरणे, 11743 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 907 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 160 अशी एकूण 1067 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात मोटार अपघात वाहन प्रकरणे 22 निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 1कोटी 86 लक्ष 35 हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणामध्ये 51 लक्ष 30 हजार 945 रुपये वसूल करण्यात आले. तसेच धनादेश अनादरीत झालेला प्रकरणापैकी 74 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. एस इंगळे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत