Breaking News

जिवती तालुक्यात होत आहे रेतीची अवैध तस्करी जोमात

जिवती तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधान आले आहे

(महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी) शेख हक्कानी जिवती :- बांधकामात महत्वाचा घटक असलेल्या रेतीची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे याचाच फायदा तालुक्यातील काही रेती माफीयांनी अवैध रेती तस्करीचा सपाटा सुरु केला आहे .हा प्रकार उघडपणे सुरु असुन यात महसुल अधिकाऱ्यांची अप्रत्यक्षपणे महत्वपुर्ण भुमिका असल्याचे सर्वत्र  चर्चीले जात आहे .

नदी घाटावर रेती बंदीचे कारण पुढे करुन दामदुपटीने एक ब्रास रेतीची किंमत आठ ते दहा हजार रुपये करुन तस्करांनी गरिबांना लुटमारीचा गोरखधंदा सुरु केला आहे .जिवती तालुक्यात गोंडपीपरी तालुक्यातील रेती घाटावरुन रेती तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे .

असे असतानाही येथील काही महसुल अधिकाऱ्यांनी रेती घाट लिलाव नसतांनाही रेती माफियांना हाताशी धरून रेती घाटामधुन अवैध उत्खनन सुरु केले आहे .

अशी होते रेतीची अवैध वाहतुक 

रेती घाटावरुन अवैधरित्या रेतीचा उपसा करुन ट्रॅक्टरने रेती गोळा केली जाते व रात्रोला मजुर किंवा जेसीबीच्या सहाय्याने हायवा ट्रकमध्ये भरुन गोंडपीपरी तालुक्यातील ,लाठी,तोहोगाव येथुन राजुरा तालुक्यातील सोंडो, विरुर,अंबुजा मार्गे गडचांदुर व सिध्देश्वर ,देवाडा ,भेंडवी मार्गे जिवती तालुक्यातील विविध गावात राजरोसपणे तस्करी केली जाते .

रेती माफियांनी महसुल अधिकाऱ्यांशी संगणमत करुन ज्या ज्या क्षेत्रातुन रेतीची अवैध वाहतुक केली जाते त्याठिकाणी संबधीत विभागाचे ' वसुली वाझे ' नेमलेले आहेत त्यांच्याकडे देणगी  देवून बिनबोभाटपणे तस्करी केली जाते .

या प्रकारामुळे रेतीचे भाव गगणाला भिडले आहे ,रेतीची बंदी अन् तस्करांची चांदी असे म्हणण्याची वेळ आली आहे .तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंञण संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाही का ? असा सवालही जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे .

रेती तस्करीची झळ सर्वसामान्यांना महागडी रेती खरेदी करून सोसावी लागत आहे .

पहाडावर दररोज शेकडो ब्रास रेती अवैधरित्या हायवाने वाहतुक केली जात आहे .या चोरट्या मार्गाने आणलेल्या रेतीचा वापर तालुक्यात सुरु असलेल्या विकासकामात केला जात आहे, शासनाच्या महसुलला चुना लावून रेती माफीयांना गब्बर बनविन्याचे काम होत आहे असे असतानाही प्रशासन मात्र मुग गिळुन बसले असल्याने त्यांच्या कार्यतत्परतेवर सवाल उपस्थित केला जात आहे .दाखवण्यापुरते एखादी कारवाई करून संबधीत विभाग आपली पाठ आपणच थोपटून मोकळे होत आहेत रेती माफियांवर कठोर कारवाई करून रेती तस्करीला आळा घालावा अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत