Breaking News

लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालय चे उपजिल्हा रुग्णालय होणार

 लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालय चे उपजिल्हा रुग्णालय होणार

     


(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) दीपक तायडे,रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन यांची स्वइच्छेने जळगांव ला 17सप्टेंबर2021रोजी बदली झालेली असून त्या नंतर डॉ प्रसाद पाटील यांचे कडे अतिरिक्त पदभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांचे आदेशानुसार सोपविण्यात आला आहे या नंतर रावेर ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरु झालेले असून नुकताच डॉ विजया झोपे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी "कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर"घेऊन जवळपास 20 लाभार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली,सदर रुग्णालयात डॉ प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ अनिकेत चव्हाण, डॉ सर्वेश अर्कडी हे दोन वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिपरिचारिका व कर्मचारी सेवा देत असून रुग्णालयातील रुग्णसेवा, साफसपाई दर्जेदार असून रुग्णांना लागणारी औषधी सामुग्री या ठिकाणी उपलब्ध असल्याचे देखिल कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

   डॉ प्रसाद पाटील यांची मूळ नियुक्ती सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असून देखील रावेर ग्रामीण रुग्णालयाचा DDO पदाचा(कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी)जबाबदारी ते पार पाडत आहेत स्थानिक लोक प्रतिनिधी व नागरिकांनी त्याना साथ दिल्यास रावेर ग्रामीण रुग्णालय अधिक बळकट होऊन उत्कृष्ठ सेवा बजावण्यासाठी सज्ज राहीन असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे

   नुकताच आमदार शिरीष दादा चौधरी यांनी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवण्यासाठी पाठ पुरावा सुरू केला असून या पाठ पुराव्याला नक्कीच यश येणार असून तालुक्यातील रुग्णनाना याचा दिलासा मिळणार आहे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सुजाणनागरिकांमधून बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत