Breaking News

ट्रक ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघातात 2 ठार 13 जखमी

 ट्रक ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघातात 2 ठार 13 जखमी

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : चंद्रपूर नागपूर महामार्गावर वरोरा जवळील लगान बार च्या समोर ट्रक आणि ट्रॅव्हल्स च्या समोरा समोर धडक झाली त्यात ट्रक ड्रायव्हर अमोल भुजाडे रा. चिखलगाव ता. वणी जिल्हा यवतमाळ तर ट्रॅव्हल्स चालक शेख शाबीर वय 40 जलनगर चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला . ट्रॅव्हल्स मधील 13 प्रवासी गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यांची प्रकृती गंभीर असल्याने या सर्वांना चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले . अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्स उभ्या ट्रक मध्ये जवळ पास 5 ते 6 फूट आत ट्रक मध्ये घुसली होती .

ही घटना आज दिनांक 14 जानेवारी 5 च्या दरम्यान घडली

नागपूर चंद्रपूर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रमांक mh40 at 481 ही चंद्रपूर कडे जात असताना वरोरा जवळील लगान बार च्या समोर ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले ट्रॅव्हल्स दुभाजकावरून लवून इलेक्ट्रिक चा खंबा तोडून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक mh34bg9540 यामध्ये समोरा समोर घुसल्याने हर्षा झाडे वनली , सुमित मानकार वणी , प्रवीण घाटे वरोरा , प्रणाली नंदकटे तेमुर्दा , सूरज दाते मजरा , संतोष गाळगटे भद्रावती, रीना बागेसर वरोरा, अनिता परचके घुगूस , रकमा तुलस कोरपना , सविता rangळे , प्राची बांगडे, सरस्वती dahule , आवेश अहमद gughus हे सर्व जखमी झाल्याने याना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रॅव्हल द्रयव्हर याला काढण्या साठी प्रयत्न केले असता त्याचे तीन तुकड्यातच रूपांतर झाले 

घटना स्थळावर नागरिकांची गर्दी बगता वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष्य नोपनी घटनास्थळी पोहचून गर्दी ला पांगविले तर या घटने दारमयन वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळबल्याने वाहनांच्या 1 किलोमीटर च्या रांगा लागल्या होत्या या वाहतुकीला सुरळीत करण्या साठी पोलिसांनी शर्तीने प्रयत्न करून ट्रॅव्हल जेसीबी , क्रेन च्या साहाय्याने हटवून वाहतूक सुरू केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत