ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी मासिक पास सुरू करा - प्रशांत बोरकर
ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी मासिक पास सुरू करा - प्रशांत बोरकर
(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर :- सध्या महागाईने त्रस्त झाले ल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून मेमु ट्रेन्स चे जादा फेऱ्यां प्सेंजर गाड्या सुरू करून सवलतीचे दरातील मासिक पास लवकर सुरू करावीत अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मद्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
अनेक नोकरदार हे तीन चार हजार रुपये महिन्यावर जळगाव भुसावळ येथील अनेक छोटे मोठे दुकाने उद्योग मद्ये काम करत होते परतू रेल्वे गाड्या बंद झालाय पासेस् बंद झाल्यामुळे अप डावून परवडत नसल्याने त्रासलेले लोकांनी नोकऱ्या सोडून दिल्या असून बेरोजगार झाले आहेत
एस टी बंद आहे तसेच खाजगी वाहतुकीचे भाडे रोजचे दोन तीनशे परवडत नाही पगार तीन चार हजार आणि येण्या जाण्या चे भाडे सहा हजार होते पेट्रोल डिझेल पण महाग झाले म्हणून गेले दोन वेशापासून शेकडो कामगार तसेच विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे .जादा मेंमु ट्रेन चे फेऱ्या सुरू केल्या तर गर्दी पण कमी होइल आणि रस्त्यावरील वाहतूक कमी होवून अपघात कमी होतील आणि जनतेला सुरक्षित आणि स्वस्त प्रवास दिलासा मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी मित्र श्री प्रशांत बोरकर यांनी केंद्र सरकार रेल्वे प्रशासन कडे आणि महाराष्ट्र राज्य सरकार कडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत