क्षमता नसणाऱ्या रोडवरून एस आर के कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओव्हरलोड ट्रक सुरू
क्षमता नसणाऱ्या रोडवरून एस आर के कन्स्ट्रक्शन कंपनीचे ओव्हरलोड ट्रक सुरू
ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोखाला-साखरा-चारगाव खुर्द रोड खराब
एस आर के कन्स्ट्रक्शन कंपनीची अवैध वाहतूक थांबवा
राष्ट्रवादी काँग्रेस चे तहसीलदारांना निवेदन
(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : एस आर के कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीचे गिट्टी, मुरूम या गौण खनिजांची ओव्हरलोड वाहतूक हि क्षमता नसणाऱ्या मोखाला -साखरा-चारगाव खुर्द या ग्रामीण भागातील वाहतुकीच्या रोडनी सुरू असल्यामुळे रोड पूर्णतः खराब झालेला आहे.तसेच साखरा गतग्रामपंचायतीला सि एस आर फंड मिळाला नाही.त्यामुळे कंपनीची ओहरलोड वाहतूक बंद करून रोडच्या नुकसानीदाखल एस आर के कंपनीकडून सी एस आर फंड ग्रामपंचायत साखरा ला देण्यात यावा अन्यथा गावविकासासाठी गावकऱ्याकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा -भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलासभाऊ नेरकर व अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका वरोरा तथा ग्रामपंचायत साखरा सदस्य दिनेश मोहारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार रोशन मकवाने यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना शिष्टमंडळात बंडूजी डाखरे, रंजनताई पारशिवे,दिपक पिरके,कुलदीप पाटील,दिवाकर निखाडे,मनोज उमरे,किशोर डांगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत