Breaking News

१४ वित्त आयोग व पेसा निधीच्या गैरप्रकाराची चौकशी करा

रुग्णसेवक जिवन तोगरे यांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतीनीधी) शेख हक्कानी, जिवती :- जिवती तालुक्यातील पंचायत समितीमार्फत १४ वित्त आयोग व पेसा निधीची कामे ग्रामसभांना अंधारात ठेऊन व शासनाच्या धोरण व नियमांना धाब्यावर ठेऊन केवळ कागदावर लाखो रुपयांची कामे सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधींनी १४ वित्त आयोगाचा निधी ग्राम विकास आराखडा निर्माण न करता तसेच शिक्षण आरोग्य, बालविकास, तसेच मागासवर्गीय ग्रामीण भागात, प्रशासकीय, इतर  खर्च करणे त्याच प्रमाणे पेसा गावातील निधी आदीवासीसाठी तसेच कला संस्कृती लोकजागरण वन उपजत तथा कौशल विकासावर करणे आवश्यक असतांना सारे नियम धाब्यावर ठेऊन ग्रामसेवकांच्या मर्जीने पदाधिकाऱ्यांनी यांनी १४ वित्त आयोग व पेसा निधीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याची तक्रार प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी केले आहे. तसेच तोगरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की येत्या सात दिवसांत चौकशी न झाल्यास गट विकास अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये स्वत:ला कोडून प्रहार संघटने तर्फे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुध्दा देणात आला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत