अंबरनाथ हादरलं चक्क दगडाने ठेचून केली तरुणाची हत्या
अंबरनाथ हादरलं चक्क दगडाने ठेचून केली तरुणाची हत्या
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई :- अंबरनाथ येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम येथील डीमसी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
डीएमसी कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात आज सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिसंकडून सुरू आहेत. हा तरुण कोण आहे? तो या परिसरात कशासाठी आला होता? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतक्या निर्घृणपणे कोणी आणि कशासाठी या तरुणाची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत