गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे प्रशिक्षण शिबीर
ॲड. वामनराव चटप व ललित बहाळे यांचे होणार मार्गदर्शन
(महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी) शेख हक्कानी, जिवती :- चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सहयोगाने शेतकरी युवा आघाडीच्या वतीने दिनांक ५ व ६ जानेवारी २०२२ ला कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गडचांदूर येथील बालाजी सेलीब्रेशन हॉल येथे होणार्या या द्विदिवशीय शिबीराला शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे शिबीर होणार असून यात शेतकरी संघटनेचे विचार व कार्यपद्धती, युगात्मा शरद जोशी यांचे योगदान, बाजारपेठ, तंत्रज्ञान यांचे स्वातंत्र्य व स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी विरोधी कायदे, संघटनेची बांधणी, युवकांपुढील आव्हाने, वेगळा विदर्भ कां ? यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
५ जानेवारी ला दुपारी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थान जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप भूषविणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्वभापचे प्रांताध्यक्ष मधुकर हरणे, माजी प्रांताध्यक्ष दिनेश शर्मा, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुधीर बिंदू, सतीश दाणी, जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दररोज तीन सत्र होणार असून प्रत्येक विषयाची सविस्तर मांडणी केली जाणार आहे. या शिबिरात ॲड.श्रीनिवास मुसळे, ॲड.दिपक चटप व रत्नाकर चटप हे शेतकरी युवकांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीचे पैलू या विषयी आपले विचार मांडून अनुभव कथन करणार आहेत. यानिमित्ताने युवकांच्या समस्या व प्रश्नांविषयी सविस्तर उहापोह होणार आहे.
या शिबिरात युवकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन शेतकरी महिला आघाडीच्या पौर्णिमा निरंजने, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, संघटनेचे डॉ.संजय लोहे, अविनाश मुसळे, संतोष पटकोटवार, निळकंठ कोरांगे, दिनकर डोहे, प्रविण एकरे, रमजान अली, प्रा.निळकंठ गौरकर, पंढरीनाथ बोंडे, मदन सातपुते, बंडू पाटील राजुरकर, प्रविण सावकार गुंडावार, विलास धांडे, संध्या सोयाम, नगरसेविका रजिया बेगम शेख ख्वाजा, शेतकरी युवा आघाडीचे ॲड.दीपक चटप, संतोष पटकोटवार, श्रीकांत घोरपडे, नरेश सातपुते, सुनील मडावी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या युवा व महिला आघाडीने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत