इसापूर शिवारात भरधाव बोलेरो पिकअप ने दिली झाडाला धडक
चार मजुरांचा मृत्यू तर ७ मजूर गंभीर जखमी
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : काटोल तालुक्यातील इसापूर शिवारात भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळून चार मजुरांचा मृत्यू झाला तर, तर ७ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून ग्रामीण रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच गर्दी केली.
हेही वाचा :- भाच्याकडे निघालेल्या मामाच्या कारचा भीषण अपघात : दोन ठार, तीन जखमी
एम एच ३६ एफ ३१६३ बोलेरो पिकअप या वाहनात १० मजूर व चालक असे ११ जण होते. दरम्यान इसापूर शिवारात हा अपघात झाला.
हेही वाचा :- कोलेज विद्यापीठ भरतीत आता एसी ओबीसी आदिवासी यांना नव्या कायदयाअंतर्गत न्याय मिळणार
या घटनेत, मनीषा कमलेश सलाम ३८, मंजुषा प्रेमा उईके ४०, कलाताई गंगांधर परतेती ५०, यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुळा वसंता धुर्वे ५० यांच्यावर नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर, जखमी वृंदा अशोक दूधकवले १७, चैतानी स्लॅम ३०, कलावंता संतोष पेंदाम ५५, येनुबाई दूधकवळे ३०, लक्ष्मीबाई तायडे ३४ सर्व राहणार अंबाडा सोनक व विशाल बॉंदे ३५ मोहपा, आकाश बत्तासे मोहपा हे गंभीर जखमी झाले, सर्व जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत