पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ
पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) अमरावती : जावयाने सासरवाडीत जाऊन सासू व पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू झालाय. तर आरोपीची पत्नी या हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा येथे घडली. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे वय(45) असे मृत महिलेचे नाव असून ही महिला टाकरखेडा पूर्णा येथील रहिवासी आहे. तर या घटनेत स्नेहल दिनेश बोरखडे वय 25 वर्षे या आरोपीच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. पत्नी आणि सासूवर जीवघेणा हल्ला करुन आरोपी दिनेश बोरखडे याने घटनास्थळवरुन पळ काढलाय. पोलीस आरोपीचा शोध असून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत