Breaking News

संतापजनक ! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलवून रिक्षा चालकाकडून १० वर्षीय मुलीवर अत्याचार

संतापजनक ! पत्ते खेळण्याच्या आमिषाने  घरात बोलवून रिक्षा चालकाकडून १० वर्षीय मुलीवर अत्याचार 

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे ;- महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अल्पवयीन व लहान मुलींनाही आपल्या वासनांचे बळी बनवण्याच्या घटनाचे प्रमाणही वाढले आहे. घराच्याजवळ राहणाऱ्या 10 वर्षीय बालिकेला घरात पत्ते खेळण्याच्या बहाणण्याने बोलवून तिच्या बलात्कार केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हददीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करा आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अशी घडली घटना आरोपी आपल्या आई सोबत पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. तो व्यवसायाने रिक्षा चालक आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी पत्ते खेळायला बोलावले. मुलगी घरात आल्यानंतर काही वेळ तिच्याशी पत्ते खेळण्याचे नाटक केलं . त्यानंतर आजूबाजूला कोणती नाही ह पाहता तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवेमारवून टाकण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. यानंतर आईने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेऊन पोलिसात तक्रार दिली आहे.

गंठण हिसकावून नेले

दुसरीकडे राजगुरू नगर परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहेयाप्रकरणी दोन अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरटयांनी तब्बल 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या दिवसही पीडित संगीता कदम या वाडा रोड परिसरातून जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कदम यांच्या गळयातील गंठण जोरात हिसकावला व तेथून पसार झाले. आरडाओरडा करेपर्यंत चोर तिथूनपसार झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत