शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उ.प्राथ. शाळा,हिमायतनगर ची दैदिप्यमान कामगिरी
शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उ.प्राथ. शाळा,हिमायतनगर ची दैदिप्यमान कामगिरी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिमायतनगरने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे. शाळेतील इयत्ता चौथी व सातवीचे प्रत्येकी ७ असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून परिसरात शाळेच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इयत्ता चौथीमधून अक्षरा परमेश्वर उपरवाड, भक्ती विठ्ठल भूते, देवांशी राहुल भोगे, गुंजन लहू भूते, माधवी बालाजी करेवाड, प्रतिक नागनाथ गोटंबे व वेदिका विलास घवाले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. तसेच इयत्ता सातवीमधून सोनम इमाम शेख, सोफिया सलाम सय्यद, जोया इलाही शेख, कृष्णा परमेश्वर भूते, मुस्तकीम सिकंदर पठाण, संस्कार विठ्ठल भूते व संध्या दीपक वाघमारे यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर(मनोज)चव्हाण सर यांचे कुशल नेतृत्व तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. सुरज कटकोजवार, कु. सुचिता ठाकरे, कु. कल्पना सकर्डे व कु. मनिषा बदखल यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पंचायत समिती जिवतीचे गटशिक्षणाधिकारी श्री. संदीप चौधरी सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. देवानंद रामगिरकर सर व केंद्रप्रमुख श्री.संग्राम केंद्रे सर व केंद्रप्रमुख श्री संजय सेलोकर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नजीर सय्यद, उपाध्यक्ष श्री. बाबाराव कांबळे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हिमायतनगरने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा आदर्श निर्माण केला असून संपूर्ण परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत