Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सकल मातंग समाज जिवती तर्फे अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सकल मातंग समाज जिवती तर्फे अभिवादन

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती तालुक्यात शहराच्या ठिकाणी सकल मातंग समाज व डॉ. आण्णाभाऊ साठे फाउंडेशन स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष प्रा. सुग्रीव गोतावळे, सचिव दत्ताजी तोगरे, राज्य समन्वयक डॉ.अंकुश गोतावळे, अंबादास कंसकटले, रमाकांत जगापल्ले, भानुदास जाधव, विजय गोतावळे, चरणदास केदासे, नागनाथ महाराज तोगरे, सौ, अनिता गोतावळे, पद्माकर पोतवळे, गजानन वाघमारे, जांभळे सावकार, बाळू मस्के, देविदास कांबळे, शिवाजी गुंटे, विजयकुमार कांबळे, गोविंद गायकांबळे, वाघमारे, रंगराव जाधव, इंद्राळे,विजय अकॅडमी चे संचालक श्री नलवाड व श्री चलवाड त्यांचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तसेच अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धेच्या माध्यमातून व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले तसेच कुंभेजरी येथील गावकऱ्यांच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. वावरे, संतोष गोतावळे पोलीस पाटील श्री लहुजी गोतावळे उपसरपंच श्री अनिल बसवंते, संजय भालेराव, बळी भालेराव, शेखर पट्टेवाले व गावकरी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी सर्वांनी महामानवांना अभिवादन करून वंदन करण्यात आले व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत