Breaking News

महर्षी मार्कण्डेय ऋषी यांना प्राचीन काळापासून अतिशय महत्त्वाचे स्थान - डॉ. मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती उत्साहात साजरी

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे महर्षी मार्कण्डेय ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगीतले की महर्षी मार्कण्डेय ऋषी यांना प्राचीन काळापासून अतिशय महत्त्वाचे स्थान भारतीय संस्कृती मध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज दि. 3 फेब्रुवारी ला महर्षी मार्कण्डेय ऋषी यांची जयंती भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

हेही वाचा : खुलेआम अवैधरित्या मुरुमाचा उत्तखन सुरू महसूल प्रशासन व वनविभागाच्या आटोक्याच्या बाहेर

   यावेळी चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारने,महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,रवींद्र गुरणुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत