Breaking News

पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

 पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न;  नेमकं काय घडलं?

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : पत्नी सोडून जाईल, या भीतीने पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन आवारात ही घटना घडलीय. प्रदीप रघुवीर पटेल असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्रदीप यांचा जीव वाचला. प्रदीप मूळचा मध्य प्रदेश येथील सागरचा रहिवासी आहे. सध्या तो नागपुरात राहतो. पत्नीच्या घरच्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी त्यांना लग्नाचा पुरावा  मागितला. पती-पत्नी उमरेड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण पत्नी घरच्यांसोबत जाईल. या भीतीने प्रदीप याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

दोघेही मूळेच मध्य प्रदेशातील

पती-पत्नी दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील. पळून आले आणि एकत्र राहू लागले. याची कुणकुण मुलीच्या आईवडिलांना लागली. त्यामुळं ते तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेले. आता आपली सहचारिणी तिच्या आईवडिलांसोबत निघून जाईल. अशी भीती त्याला वाटली. त्यामुळं त्यानं हे आत्मघाती पाऊल उचललं. ती आपल्यापासून वेगळी झाल्यास आपलं कसं होणार, असा प्रश्न त्याला सतावत होता. त्यातून त्यानं हे पाऊल उचललं असावं, असं पोलिसांना वाटतं. घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान साधलं. त्यामुळं त्याचा जीव वाचला. योग्य वेळी उपचार मिळाले नसते तर अडचण झाली असती. त्यामुळं बेकायदेशीर काम करताना जरा विचार केला पाहिजे. अन्यथा कोणती वेळ कशी येईल. काही सांगता येत नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत