पाटण ते नंदप्पा- सोरेकासा रस्त्याच्या कामाकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! बांधकाम तपासणी समिती अनभिज्ञ
पाटण ते नंदप्पा- सोरेकासा रस्त्याच्या कामाकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! बांधकाम तपासणी समिती अनभिज्ञ
(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) शेख हक्कानी, जिवती : -जिवती : तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू असून पंतप्रधान ग्राम सडक योजना- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर अनेक योजनेचा अंतर्गत शासन-प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा माध्यमातून डांबरीकरण रस्ते - ब्रिज-पुलीया- काॅंक्रेट रस्ते, नाल्यांचे काम व घाट रस्त्याला सरंक्षण भिंत चे काम जिवती तालुक्यात सुरू असुन शासन-प्रशासन चांगले दर्जेदार काम करण्याकरिता कोट्यावधी रुपये कामासाठी खर्च करीत आहेत परंतु तालुक्यातील पाटण ते नंदप्पा- सोरेकासा या मार्गाचे संथगतीने काम सुरू असुन या कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल अंदाजपत्रका नुसार वापरले जात नसुन याच परिसरातील निकृष्ट दर्जाचा मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापरण्यात आला आहे.मुरुमाची जाडी - जिएसबीची जाडी-गिट्टीची जाडी ज्या प्रमाणात वापरली जाते त्या प्रमाणात वापरण्यात आली नाही.
हेही वाचा : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे ७ आणि ८ फेब्रुवारीअशा दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
या कामासाठी नेमण्यात आली असलेली बांधकाम तपासणी समिती थातूरमातूर तपासणी करून संबंधित कंत्राटदारांच्या बाजूने दर्जादार काम झाल्याचे अहवाल देतात त्याचे कारण तसेच आहे. लक्ष्मी दर्शन बंद पाॅकेट मध्ये देण्यात येते व मटना सोबत ओल्या पार्ट्या केल्या जात असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे ? सध्या बिबीएम डांबरचे काम झाले त्याची जाडी तपासण्यात यावी.
या मार्गावर लहान पाईप पुलीयाचे काम व सिमेंट काॅक्रेट रस्त्याचे काम झाले.नंदप्पा घाट मध्ये रस्ता घसरू नये म्हणून सिमेंट काॅक्रेट ची संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असून या कामासाठी निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत काळी रेती व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याने या निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित कंत्राटदार व बांधकाम अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी शेख हक्कानी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बातमीच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा : स्वयंपाकास उशीर झाल्यानं पतीचं राक्षसी कृत्य; डिझेल ओतून पत्नीला जिवंत जाळलं


कोणत्याही टिप्पण्या नाहीत