Breaking News

अज्ञात वाहनाचे धडकेत गुराखी ठार, डॉ चांडक यांचे शेताजवलील घटना

 अज्ञात वाहनाचे धडकेत गुराखी ठार, डॉ चांडक यांचे शेताजवलील घटना

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर, वरोरा) :- मृतक हा आपल्या मालकांची गुरे चराईसाठी नेत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिली.सदर अपघातात गुराखी जागीच ठार झाला. मृतक गुराख्याचे नाव  कवडू शंकर मांडवकर  वय 60 वर्ष,रा.एकार्जुना,ता.वरोरा ,जिल्हा -चंद्रपूर ,घटना चंद्रपूर -नागपूर महामार्गावरील डॉ.चांडक यांचे शेताजवळ 4 फरवरी 2022 ला सकाळी 11. ते 11.30 च्या दरम्यान घडली.  मृतक  कवडू शंकर मांडवकर हा डॉ.चांडक यांचेकडे त्यांचे गुरे चारण्यासाठी गुराखी म्हणून नोकर होता.नेहमीप्रमाणे गुरे चारण्याची वेळेत गुरे घेऊन मृतक महामार्गावरून निघाला.

परंतु एका अज्ञात वाहनाने वृद्ध मृतक गुराख्याला जबर धडक दिली.आणि त्यामध्ये मृतक जागीच ठार झाला. मृतकाला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले.येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बेलसरे यांनी अज्ञात वाहनांचा शोध लावण्याचे दृष्टीने शोध मोहीम सुरू केली आहे .

  चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील गतिमान वाहनांमुळे अनेकांचे जात आहे जीव महामार्गावर स्पीड ब्रेकर राहत नसल्यामुळे सुसाट वेगाने वाहने चालविल्या जातात.वाहनांचा वेग कमी असावा यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी असते.परंतु पाहिजे तसे कर्तव्य दिसून येत नाही.त्यामुळेच चंद्रपूर -नागपूर महामार्गावर अपघाताची शृंखला च सुरू असल्याचे दिसून येत आहे.येत्या आठ दिवसात अपघातात दोन इसम अपघातात ठार झाल्याची घटना आहे.

भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक नियंत्रण विभागाने कार्यवाहिचे पावले उचलावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत