Breaking News

माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन

माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन 

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर :- माता रमाई आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे येथिल तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले  यावेळी प्रथम विश्वशांतिदुत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पपूज, दिपपूजा व धूपपूजा करण्यात आली त्यानंतर माता रमाई यांच्या प्रतिमेस सुमन कोंघे, रजनी सपकाळे, आशा महाले, निर्मला तायडे,संगीता अटकाळे, नगरसेविका रंजना गजरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपपूजा व धूपपूजा करण्यात आली यावेळी रंजना गजरे व संगीत अटकाळे यांनी माता रमाई यांच्या त्यागा बद्दल माहिती देऊन माता रामाईंचा सर्व महिला भगिनींनी आदर्श घेऊन जीवन जगावे असे आवाहन केले. कार्यक्रमास उज्वला सूरदास, प्रमिला लोंढे, रेखा भालेराव, अरुणा रायमळे ,मंगला दामोदरे आदी महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन रंजना गजरे यांनी तर आभार प्रदर्शन मंगला दामोदरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत