गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; बैलबंडींसह मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त
गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; बैलबंडींसह मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) गडचिरोली : जिल्हा वनसंपत्तीने नटलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उच्च जातीचे सागवान उत्पादित होते. सागवानाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वन विभागाचे कर्मचारी तैनात असतात. परंतु या कर्मचाऱ्यांना शह देत तस्कर वन तस्करी मोठ्या प्रमाणात करतात. तेलंगणा राज्यात ही तस्करी केली जाते. गडचिरोलीच्या जंगलातून लाकडं तोडायची आणि तेलंगणात न्यायची, असा हा प्रकार उघडकीस आला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. तस्करांनी अल्लापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत झिमेला जंगल परिसरात तस्करी करत असल्याची घटना उघडकीस आली. मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. जंगलातून अवैद्य सागवान तस्करी करीत असताना वनविभागाने कारवाई केली.
साडेआठ लाखांचे साहित्य जप्त
आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्तीवर होता. या पथकाने वन तस्करांवर जंगलातच धडक कारवाई करण्यात आली. सागवान लाकडे जप्त करण्यात आलीत. बैलांना तसेच आरोपीला अटक करण्यात आली. यात आठ लाख 50 हजार रुपयांचे सागवान लाकडे होती. सहा बैलगाड्या हाकणारे बारा बैलांना अटक करण्यात आली. या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
काही आरोपी फरार
या कारवाईचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी केले. या प्रकरणातील अजून काही आरोपी फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या फरार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपी वन विभागाच्या ताब्यात असतील. एका मोठ्या अवैध तस्करीला आळा घालण्यात आम्ही यशस्वी झाल्याची माहिती शेरेकर यांनी दिली. गडचिरोली जिल्हा म्हणजे ऑक्सिजन हब आहे. जंगल असल्यानं त्याठिकाणी तस्करही सक्रिय असतात. प्रत्येकवेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ते सापडतीलच असं नाही. कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन ते पसार होतात. यावेळी मात्र तस्कर वनविभागाच्या जाळ्यात सापडलेत. तरी काही आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरलेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत