भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
(माण) आंधळी:- कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची शिव जयंती आंधळी गावात भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भीमरत्न ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.किशोर खरात सर यांनी असे आवाहन केले की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटन मध्ये सहभागी होऊन शिव, फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार समाजातील तळागाळातील प्रत्येक घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करावे अशी अपेक्षा भारतीय विद्यार्थी मोर्चा कडुन व्यक्त करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणाली कि महाराष्ट्र तसेच भारत भर आनंदाचा सन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शिवरायांना पुष्प अर्पण करून शिरायांच्या विचारांना अभिवादन करून, तसेच साखर वाटून आनंद व्यक्त केला.
या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा सर्वांनी संकल्प केला. व शिवरायांची शिकवण देशाला संदेश देणारी असून, छत्रपतीचा विचार मनात सदैव ठेऊन राहिलेले रयतेचे राज्य लोकशाहीच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करू. शेतकरी कष्टकरी स्त्री-पुरुष सुखानी नांदत होती. अन्याय अत्याचार होत नव्हता. तसेच जाती भेद, धर्म भेद, दुजा भाव, असा शिवरायांच्या राज्यात नव्हता. त्याच प्रमाणे समाज्यात शिवरायांच्या मनातील राज्य आनू असे समाज बांधव म्हणत होते.
यावेळी लहान चिमुकल्या मुलींनी आपल्या भाषणात शिवरायांच्या पराक्रमाची व विचारांची उंची सांगितली. छत्रपती हे बहुजन रक्षक होते व सर्वांच्या हिताचं राज्य कारभारक होते. सर्वान समान न्याय देण्याची भूमिका शिवरायांची होती. असे अनेक प्रसंग आपल्या भाषणाय मुली सांगत-सांगत शिवरायांच्या विचारांची जयंती साजरी झाली. व यावेळी आराध्या खरात, श्रेया खरात, सई खरात, सरस्वती नामदास, नमिता खरात, गायत्री माने, अंकिता खरात या पहिली ते सहावी च्या विद्यार्थीनींनी भाषण केले.
यावेळी जयंती उत्सवास सविता खरात, मंदा रणदिवे, प्रियांका खरात, ऋतुजा खरात व राजेश खरात भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.किशोर खरात, संयोजक आयोजक आणि भीमरत्न ग्रुप उपस्थित होते. व सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत