30 तोळे सोन्यावर चोरांचा डल्ला, शेतकरी कुटुंब सदम्यात,
30 तोळे सोन्यावर चोरांचा डल्ला, शेतकरी कुटुंब सदम्यात
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : बारामतीमधील एका गावात भर दिवसा चोरीची घटना घडली आहे. शेतकरी कुटुंब शेतात गेलं असताना दुपारच्या वेळी काही चोरांनी घरातील तब्बल 30 तोळे सोने चोरुन नेले. या सोन्याची किंमत तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या घरात चोरी झाली ते कुटुंब आतून पूर्णपणे खचलं आहे. खरंतर दोन घरांमध्ये ही चोरी झाली आहे. पण हे दोन्ही घरं एकाच कुटुंबाचे आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचे ती घरं आहेत. चोरांनी चोरी करताना घरात प्रचंड पसारा केला. त्यांनी कपाट उघडलं. कपाडातील सामान आस्ताव्यस्त केलं. त्यातून त्यांनी 30 तोळे सोने चोरुन नेलं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पीडित कुटुंबाला आता पोलिसांकडे आशा आहे.
कऱ्हावागज येथील मच्छिंद्र जानकर आणि गोरख बनकर हे सख्खे भाऊ शेजारी-शेजारी राहतात. घरातील सर्व माणसं शेतीकामासाठी गेले होते. मच्छिंद्र बनकर घरी होते. मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते देखील रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 15 तोळ्या पेक्षा जास्त दागिने चोरुन नेले. घरासमोरच राहणारे त्यांचे भाऊ गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप कटावणीने उचकटून तीन गंठण, अंगठ्या, राणीहार, सोनसाखळ्या असा जवळपास 18 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. गोरख आणि मच्छिंद्र जानकर यांचे दोघांचे मिळून जवळपास 30 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पडताळणीचे काम सुरु आहे. याप्रकरणी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत