खुलेआम अवैधरित्या मुरुमाचा उत्तखन सुरू महसूल प्रशासन व वनविभागाच्या आटोक्याच्या बाहेर
खुलेआम अवैधरित्या मुरुमाचा उत्तखन सुरू महसूल प्रशासन व वनविभागाच्या आटोक्याच्या बाहेर
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जिवती : तालुक्यात विकास कामांचा सपाटा रस्त्ये - मोठ मोठे पुलिया आणि अनेक विकासकामे केली जात आहे जिवती तालुका आदिवासी अतिदुर्गम असल्यामुळे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जिवती तालुक्याकडे विशेष लक्ष देवून अनेक योजनेचा माध्यमातून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आली असून रस्त्ये पुलिया नाल्या व इतर अनेक बांधकाम सुरू असून या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.जिवती तालुक्यातील शेणगाव ते हिमायतनगर- टेकामांडव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून रस्त्याच्या साइड भरण करण्यासाठी रस्त्याच्या परिसरातील खुलेआम दिवसा ढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात जिसीपीच्या सहाय्याने ट्रॅक्टर द्वारे अवैधरित्या मुरमाची उत्तखन्न करून रस्त्याच्या कडेला वापरण्यात येत आहे संबंधित कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य कुठून आणायचे हि माहिती अंदाजपत्रकात नमूद असून संबंधित कंत्राटदार परिसरातील निकृष्ट दर्जाचा मुरुम वापरण्याचा सपाटा लावला असून खुलेआम अवैधरित्या मुरमाची उत्तखन्न करणाऱ्या कंत्राटदारांवर महसूल प्रशासन व वनविभाग मेहेरबान असल्याचे चर्चेला उधाण आले आहे सध्या रेती घाट बंद असल्याने तालुक्यात ज्या नदीवर व नाले वर पुलियाचे काम सुरू असून त्याच परिसरातील व मातीमिश्रत रेती उपसा करून पुलियाच्या कामासाठी वापर करण्याचा सपाटा लावला जात असल्याने या निकृष्ट कामाकडे संबंधित बांधकाम प्रशासन सुध्दा मुंग गिळून गप्प असल्याचे समजते काम कसेही करा कमिशन द्या यामुळे कंत्राटदार मुजोर झाले आणि संबंधित बांधकाम अभियंता कमिशन घेऊन कोमात असल्याचे पावती सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दिसून येत आहे.खुलेआम अवैध रित्या मुरुमाच्या उत्तखन्न करणाऱ्या कंत्राटदारांवर महसूल प्रशासन व वनविभाग हतबल झाला का? अशी चर्चा सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत