'दिलखुलास' कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला
'दिलखुलास' कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला
यांची आज मुलाखत
महा घडामोडी न्युज नेटवर्क नागपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "दिलखुलास” या कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर.विमला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्युज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवरून शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती राखी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्रातील अभिनव अशी महिला मॅराथॉन स्पर्धा जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आयोजित केली आहे. 'ब्रेक द बायस ' अर्थात भेदभाव सोडा. तसेच 'रस्ता सुरक्षा ' 'महिला सुरक्षा ' आदि विविध विषयांची माहिती श्रीमती आर.विमला यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे. 13 मार्च रोजी नागपूरच्या रस्त्यांवर संपूर्ण महिला जगत उतरणार आहे आठवी, नववी व अकरावी शिकणाऱ्या मुली व त्यांच्या माता भेदभाव सोडा असे आवाहन करणार आहे. या आयोजनामागची भूमिका या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केली आहे.७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत