सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण होणार
सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण होणार
महा घडामोडी न्युज नेटवर्क नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीच्या स्कूलबस धोरणानूसार शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूलबस करीता विनियम ) नियम 2011 नियम केले आहे. या नियमामध्ये वाहनधारक, वाहन चालक व शालेय व्यवस्थापन यांच्यावर शालेय विद्यार्थ्यांच्या सूरक्षित वाहतूकीच्या दृष्टीकोनातून तसेच जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानी दिलेल्या निर्देशानुसार स्कूलबसचे नियमित योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने सद्यस्थितीत ज्या स्कूल बस वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले आहे किंवा ज्या स्कूल बसेसला योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन तारीख व वेळ मिळत नाही, अशा वाहनधारकांनी शनिवार आणि रविवार विशेष सुट्टीच्या दिवशी स्कूल बस वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करता येणार आहे. परंतु त्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकारी यांना सूचित करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन नागपूर ( शहर ) यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत