पोटच्या मुलावर तलवारीनं वार, मुलाचा मृतदेह घरासमोर पुरला
पोटच्या मुलावर तलवारीनं वार, मुलाचा मृतदेह घरासमोर पुरला
महा घडामोडी न्यूज नेटवर्क झारखंड : राज्यातील खुंटी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तुमच्याही अंगावर काटा आणेल. झारखंडच्या खुंटी येथे मद्यधुंद पित्यानं आपल्या पोटच्या मुलाची तलवारीनं वार करून हत्या केली.
यानंतर नराधम पित्यानं आधी हा मृतदेह झुडूपात लपवला. त्यानंतर तो लपवण्यासाठी घरासमोरच खड्डा खणून त्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेतील क्रूरतेची परिसिमा गाठणाऱ्या पित्यानं लोकांनाही धमकावलं आहे.
कोणीही पोलिसात तक्रार केल्यास त्यालाही मारुन टाकण्याची धमकीच या क्रूर बापानं दिली. या धमकीनंतर काहीकाळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. कारण, या माथेफिरु बापाचं काही नेम नव्हता. तो कुणावरही तलवारीनं हल्ला करु शकतं होतं. यामुळे ग्रामस्थांनी सावधानीपूर्वक या क्रूर बापाच्या हातातील तलवार हिसकावली.
झारखंडमधील पित्यानं केलल्या क्रूरतेमुळे परिसरात भीती पसरली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, आरोपी पत्नीशी देखील भांडत असायचा. तिलाही त्याने अनेकदा मारहाण केली होती. यामुळे पत्नी 6 महिन्यांपासून माहेरी राहत होती. हा क्रूर बापाच्या आणि पतीच्या कृत्याची स्थानिकांना कल्पना होती. यामुळे आरोपी दारु पित असताना ग्रामस्थांनी त्याच्या हातातील तलवार काढून घेतली. झारखंडमधील या घटनेनं परिसरात काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत