Breaking News

सरस्वती विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

सरस्वती विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : पालांदूर चौ येथील सरस्वती विद्यालयात जागतिक महिला दिन मोठया थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. ए. सय्यद होते.प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र लाडे, नामदेव गिर्हेपूजे, ईश्वर हटवार,विमल गिर्हेपूजे,मंगेश गिरी आणि स्वीटी चव्हाण उपस्थित होत्या.


 सर्वप्रथम महिला शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. लाडे यांनी महिला दिनाचे महत्त्व सविस्तर विशद केले.
 याचप्रसंगी वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांकडून वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतामधून 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .अध्यक्षीय भाषणानंतर आभारप्रदर्शन भारती बाचलकर हिने केले .या कार्यक्रमाचे संचालन रिया काणेकर हिने केले.

1 टिप्पणी: