Breaking News

पिपरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, 3 आरोपी जेरबंद

पिपरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, 3 आरोपी जेरबंद


महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात गस्त घालत होते. कुही तालुक्यातील पिपरी शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यंकटेश सिटीच्या पडीत ले-आउटमध्ये हे अवैध धंदे सुरू होते. या ठिकाणी धाड टाकली असता पोलिसांनी खेडी येथील शैलैंद्र चिकटे, खलासना येथील संकेत पारधी, 


अजनी येथील प्रज्ज्वल गिरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ओमनी व्हॅन जप्त करण्यात आली. अॅक्टिवा तसेच बावीस हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. ही कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात 


गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, चंद्रशेखर गडेकर, मदन पटले, महेश जाधव, बालाजी साखरे, अजीज दूधकनोज, अमृत किंगे, मयूर ढेकळे यांच्या पथकाने केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत