Breaking News

पाच टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत धनादेश वाटप

पाच टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत धनादेश वाटप
       महालगाव ग्रा.पं.चा उपक्रम 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे, गोंदिया : दीनांक:-०८/०३/२०२२ रोज मंगळवार ला ग्रा.पं. कार्यालय महालगांव येथे सरपंच अशोक‌ कापगते यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.व ग्रामनिधी मधून ५ टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत २८ लाभार्थी यांना प्रति लाभार्थी १३,००/-रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच ओमप्रकाशजी नाईक , युवराजजी सोनटक्के, ग्रा.पं.स.खेमूजी लाडे, .विलासजी नागोसे ,सौ.मंगलागौरी लोंढे ,सौ.यशोधराबाई शहारे,सौ.दर्शनाबाई शहारे ,सौ.सुषमाबाई पुराण, श्रीमती.शोभाबाई कळाम अंगणवाडी शिक्षिका,सौ.पुजाबाई रामटेके आशा सेविका,सौ.दुर्गाबाई भोयर,सौ.रामटेकेबाई अंगणवाडी मदतनीस,ग्रा.पंचायत कर्मचारी श्री.कार्तिक राणे, रंजित नागोसे, रोजगार सेवक रमेश रामटेके, संगणक चालक राकेश लांडगे व गावातील महिला मंडळी उपस्थित होते. या कार्यक़माचे संचालन ग्रामपंचायत कार्यालय महालगांव चे ग्रामसेवक श्री.अरुणजी हातझाडे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत