महर्षी शाळेला कोण पाठीशी घालते ? आ. भोंडेकर विधानसभेत गरजले
महर्षी शाळेला कोण पाठीशी घालते ? आ. भोंडेकर विधानसभेत गरजले
भंडारा जिल्हा प्रतिनिधी नरेद्र मेश्राम
भंडारा: गोर गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक लुट करुन पालकांशी मुजोरी करणाऱ्या विद्यामंदिर बेला या शाळेवर कारवाई करण्यात होत असलेल्या विलंबाबाबद तिव्र नापसंती व्यक्त करीत सदर संस्थेला पाठीशी घालणाऱ्याचे नाव जाहिर करण्याचे आव्हान आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज सभागृहात केले. महर्षी विद्या मंदिर बेला या संस्थेने अव्वाच्या सव्वा फीस वसुली केली जात असल्यामुळे २०१९ ते २०२१ या काळात १ कोटी ७ लक्ष ९१ हजार ४०० रु. इतकी रक्कम वसुलीस पात्र असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने दिला आहे.
सदर संस्थेतील वर्ग ९ ते १२ च्या तुकड्यात कोणत्याही परवानगी शिवाय सुरु करण्यात आल्या आहेत. सोबतच संस्थेच्या इमारतीचे स्थानांतरण नियम बाह्य असल्याचा अहवाल मागील वर्षभरापूर्वी शिक्षण मंत्र्यांना देण्यात आला मात्र कारवाईस टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे या धोरणाला कंटाळून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातुन अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. लॉकडाऊन काळात काही विद्यार्थ्यानी फीस भरली नाही म्हणून त्यांना शाळा व्यवस्थापनाने परीक्षेपासून वंचित ठेवले होते.
पालकांसोबत याचा जाब विचारायला गेलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल केले होते तेव्हापासून या शाळेची उलटी गिनती सुरु होऊन कारवाईचा ससेमीरा मागे लागला. आजच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सदर शाळेवर कारवाई होणार हे शिक्षमंत्र्यांच्या उत्तरावरुन स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्याची आर्थिक लूट करुन पाकांशी अरेरावी करणाऱ्या इतर शाळांचे यामुळे धाबे दणाणले आहेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महर्षी विद्या मंदिरचे प्रकरण लावून धरत विद्यार्थी व पालकांसाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल अनेक पालकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत