Breaking News

मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे,गोंदिया : मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रलंबित मानधन वाढ व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत शासनाला जाग यावी याकरिता दिनांक दहा मार्च पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे अश्या आशयाचे निवेदन पंचायत समिती गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक देता यांची ओपरेटर कंत्राटी या पदाची तुलना केली असता हे पदे मुख्यत्वे मनरेगा या योजनेचा मुख्य गाभा आहे जी आय एस सेक्यूअर सेल्फ जिओ  टय्याग टी एम एस एन एम एम एस मूल्यांकन ग्रामसभा शिवार फेरी आराखडे तयार करणे मस्टर काढणे नोंदी करणे आधार बँक खाते नोंदविणे ईमेल अहवाल आढावा सभा व इतर कामांचे नियोजन करावे लागतात पंचायत समिती तसेच तहसील स्तरावर प्रत्येक सभेला अहवाल देणे सोबतच मजुरांना गावातच काम उपलब्ध करुन स्थलांतरण थांबविण्याचे काम सुद्धा करावे लागते एकंदरीतच मजुरांना गावात रोजगार उपलब्ध करून देण्यात या यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असते.


 महाराष्ट्र राज्यात कोरोनाविषाणू  प्रादुर्भावापासून या कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता मजुरांना कामे उपलब्ध करून दिली या अनेक कर्मचारी कोरूना बाधित झाले आमच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास तुटपुंजे मानधन मध्ये परवडण्यासारखे नाही मनरेगा कंत्राटी कर्मचारी यांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावा किंवा पश्चिम बंगाल राज्याप्रमाणे वाढ देण्यात यावी दिनांक 11 सप्टेंबर 2019 नुसार झालेली मानधन वाढ अनुभवानुसार मिळाली नसून त्यामध्ये असलेल्या तफावतची रक्कम अदा  करण्यात यावी सीएससी रद्द करावी ऑनलाइन हजेरी रद्द करावे.


दरवर्षी मानधना मध्ये किमान आठ टक्के वाढ देण्यात यावी ग्रामरोजगार सेवकांचा मानधन वाढवून देण्यात यावा सर्व कर्मचारी यांना पीएफ लागू करावा व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनरेगा कर्मचाऱ्यांनी दिनांक 10 मार्च ला सकाळी नऊ वाजता पासून शासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून सर्व कर्मचारी बाहेर पडतील दैनंदिन कामकाज अहवाल देण्यात येणार नाही तसेच दिनांक 15 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष काम बंद आंदोलन अमलबजावणी करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मनरेगा कंत्राटी कर्मचारी यांनी दिले आहे एकंदरीतच या कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे रोजगार हमीची कामे ठप्प होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत