मा.शिक्षणाधिकारी महेंद्रजी मोटघरे साहेब यांच्या हस्ते अर्जुनी मोर. येथे भव्य शैक्षणिक किट वाटप
मा.शिक्षणाधिकारी महेंद्रजी मोटघरे साहेब यांच्या हस्ते अर्जुनी मोर. येथे भव्य शैक्षणिक किट वाटप
महिला शिक्षिका भगिनींचा व नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी-मोर यशस्वी आयोजन
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे,गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यातील शिक्षकांच्या आर्थिक सहकार्याने अर्जुनी मोर. तालुक्यातील सर्व शाळेतील 180 विध्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील जवळपास सर्व महिला शिक्षिकांचा यावेळी पुष्पगुच्छ, ग्रामगीता आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.19 नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रामगीता देऊन सत्कार ...कार्यक्रमाला शिक्षक बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



गोंदिया जिल्ह्यातील जि. प. शाळेत कार्यरत सर्व शिक्षकांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 2750 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप व क्रातीज्योती सावित्रीबाई फूले विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत दि.08/03/2022 ला कोहळी समाज सेवा मंडळ सभाग्रह अर्जुनी मोर.येथे मा. श्री. महेंद्रजी मोटघरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.)यांचे शुभहस्ते
दिपप्रज्वलक मा. श्री.विलास निमजे साहेब खंडविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव
शैक्षणिक किट वितरक मा. श्री.आर.एल. मांढरे साहेब, गटशिक्षणाधिकारी अर्जुनी/मोर. मा. श्री. अशोकजी बरईकर शिक्षण विस्ताराधिकारी अर्जुनी मोर. मा. श्री. लोकेशजी मोहबंसी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मा. श्री. दिघोरे साहेब, विस्तारआधिकारी तिरोडा यांचे प्रमुख उपस्थितीती.
तसेच विशेष अतिथी तथा सत्कारमूर्ती (नवनियुक्त जि.प. सदस्य) मा. लायकरामजी भेंडारकर, मा. रचनाताई गहाणे,मा. श्रीकांतजी घाटबांधे,मा.कविताताई कापगते,मा. जयश्रीताई देशमुख,मा. पौर्णिमाताई ढेंगे,सत्कारमूर्ती (नवनियुक्त पंचायत समिती सदस्य),मा. नूतनलालजी सोनवाने,मा. होमराजजी पुस्तोडे,मा. संदीपजी कापगते,मा. नाजुकजी कुंभरे,मा.कुंदाताई लोगडे,मा.शालिनीताई डोंगरवार,मा.सविताताई कोडापे,मा. घनश्यामजी धामट,मा.फुलचंदजी बागडेरिया,मा.भाग्यश्रीताई सयाम,मा.चंद्रकलाताई ठवरे,मा.आम्रपालीताई डोंगरवार,मा. पुष्पलताताई द्रुगकर यांचे विशेष उपस्थितीत आणि मा. श्री. किशोरजी डोंगरवार,जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती परिवार गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. संदीप तिडके,राज्य कार्यकारिणी सदस्य मा. संदीप मेश्राम जिल्हा सरचिटणीस मा. नीलकंठ बिसेन अध्यक्ष, शिक्षक समिती आमगाव मा. गजानन पाटणकर अध्यक्ष, शिक्षक समिती देवरी मा. दिनेश ऊके अध्यक्ष, शिक्षक समिती सालेकसा मा. बी.एस. केसाळे जिल्हा संपर्कप्रमख, शिक्षक समिती गोंदिया व तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षक बंधू भगिनी शिक्षक ,पालक व विध्यार्थी यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाला.



आपल्या प्रास्ताविकेतून तालुकाध्यक्ष रमेश गहाणे यांनी 'एक हात मदतीचा.. दर्शन घडवूया माणूसकिचा' हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा संपूर्ण जिल्ह्यात गरिब व गरजू विद्यार्थ्यांकरीता राबवविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 2750 विद्यार्थी लाभान्वित होणार असून कोराणामूळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा सावित्रीबाई फूले विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले याअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व जि प शाळा मधील 180 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी मा. मोटघरे साहेब यांनी आपल्या भाषणातून संघटनांची आपल्या शैक्षणिक समस्या सोडविण्या सोबतच सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांचे हिताचे कार्य प्राधान्याने करावे असे प्रतिपादन केले,वेळेची मर्यादा पाळून मा. लायकराम भेंडारकर मा.रचनाताई गहाने, मा.किशोर डोंगरवार व संदीप तिडके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीकृष्ण कहालकर यांनी केले तर आभार कैलास हांडगे यांनी मानले कार्यक्रमाला बहूसंख्येने शिक्षक समिती पदाधिकारी व शिक्षक बांधव तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व म.रा.प्रा. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मौलाचे सहकार्य केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत