Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्त्यांच्या निषेधार्थ ढोल बाजावो आंदोलन.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्त्यांच्या निषेधार्थ ढोल बाजावो आंदोलन.


महा घडामोडी न्युज नेटवर्क,जळगाव : नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हप्त्यांच्या निषेधार्थ नईम खान सह लाभार्थ्यांनी नगरपंचायत समोर ढोल बाजावो आंदोलन केले.

        योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले घराचे काम पूर्ण केले आहे. व काही लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन काम पूर्ण केले अश्या परिस्थितीत काम पूर्ण करूनही योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते टाकलेले नाही. त्याच्या निषेधार्थ बोदवड नगरपंचायतीच्या समोर ढोल बाजावो आंदोलन केले. व आंदोलांकर्त्याची व मुख्याधिकाऱ्यांची राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक मुजमिल शाह, लतीफ शेख, हकीम बागवान यांनी मध्यस्ती करत लाभार्थ्यांच्या अडचणीवर लक्ष देऊन लवकरात लवकर लाभार्थ्यांर्थ्याच्या खात्यात हप्ते वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 

        त्यावेळी नईम खान बागवान,ऐनूर ठेकेदार, महमूद,राजू टेलर,लखन माळी, ठेकेदार,लुकमान पिंजारी,समशेर ड्रायव्हर यांच्या सहीत अन्य लाभार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत