आत्मनिर्भर भारत घडविण्यास सज्ज व्हा...!
आत्मनिर्भर भारत घडविण्यास सज्ज व्हा...!
आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
शेकडो कार्यकर्त्यांचा आत्मनिर्भर भारतमध्ये प्रवेश
महा घडामोडी नुज नेटवर्क.चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देश डिजिटल होत आहे.या डिजिटलायझेशन मूळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.या सोबतच रोजगाराची नवनवीन संधी उपलब्ध होणार आहे.देश आत्मनिर्भर व्हावा हे मोदींचे स्वप्न आहे.त्या दिशेने वाटचाल सुरू आहे,देशाला आत्मनिर्भर करायचे असेल तर या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्यातील कौशल्यवृद्धी करा.नोकरी देणारे बना.आत्मनिर्भर भारत घडविण्यास सज्ज व्हा,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी वित्तमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे भाजपा आत्मनिर्भर भारत मध्ये प्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले,उमेश आष्ट्नकर,रवी लोणकर, रणजित डवरे, श्रीकांत देशमुख, शुभम शेगमवार,अभय रॉय, कविता,अनुपम भगत,वैशाली पवार, शुभम सराफ,अन्नपूर्णा यांची उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,शेवटच्या माणसाची सेवा हेच आमचे ध्येय आहे.त्यामुळे शेवटच्या माणसाला सर्वस्तरावर मदत करायला पुढाकार घ्या.असे ते म्हणाले.या प्रसंगी आ मुनगंटीवार यांचे हस्ते आत्मनिर्भर भारतमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना स्वागत पत्र दिले.
आत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्षपदी किरण बुटले.
अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किरण बुटले यांना नुकतेच आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.आत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी जाहीर केले.बुटले या किरणाश्रय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असून आरोग्य भारतीच्या विदर्भ संयोजक आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत