Breaking News

हरिश्चंद्र लाडे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितिय क्रमांकाचे मानकरी

 हरिश्चंद्र लाडे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितिय क्रमांकाचे मानकरी



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, भंडारा  ; हरिश्चंद्र लाडे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय नवेगाव बांध येथील सामाजिक कार्यकर्ते, लेखक, प्रबोधनकार हरिश्चंद्र देवाजी लाडे यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने १४ एप्रिल २०२० विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. पण २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव असलयाने व कार्यक्रमास परवानगी नसल्याने यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यास विलंब झाला . सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक २६ मार्च रोजी हातकणंगले तालुक्याच्या वतीने इरा हाल , वडगाव वाठार रोड , कोल्हापूर येथे संपन्न होत आहे.

  हरिश्चंद्र लाडे यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत