Breaking News

भारत सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचे कार्य स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत


प्रधानमंत्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनाचे लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचे कार्य स्थानिक स्वराज्य संस्था करीत आहेत.
 पंचायत राज दिनानिमित्त मा खा. सुनील मेंढे.


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, भंडारा : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत राज दिनानिमित्त विशेष ग्रामसभा व केंद्रीयस्तरीय पंडित दीनदयाल पंचायत सशक्तिकरण सन २०२० - २०२१ चा पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत नेरीला मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हापरिषद भंडारा यांनी ग्रामपंचायत नेरी ता मोहाडी येथे केले होते.


 यनिमित्ताने मा खासदार श्री सुनीलजी मेंढे यांच्या शुभहस्ते नेरी ग्रामपंचायतीचे जि प सदस्य मा आनंद मलेवार,सरपंच मा रामदास जगनाडे व सर्व ग्रा प सदस्य यांचा स्वागत, सत्कार करण्यात आले.


    यावेळी मा राजूभाऊ कारेमोरे आमदार, मा आनंदभाऊ मलेवार जि प सदस्य, मा रामदास जगनाडे सरपंच, मा महेश कळंबे उपसरपंच, पाचगाव, मा गणेशजी हिंगे, मा मुन साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जि प भंडारा, मा किरण कोवे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि प भंडारा, मा सौ पल्लवी वाडेकर गट विकास अधिकारी, मा गुरूदास सेलोकर, मा कमलेश वैद्य ग्रा. प. सदस्य, मा मधुकर पटले त. मु. अध्यक्ष, पाचगाव, मा रामूजी बदले, मा सौ लक्ष्मीताई पालांदूरकर ग्रा. प सदस्य, मा सौ निरंजनाताई हजारे, ग्रा प सदस्य, मा सौ साधनाताई पडोळे ग्रा प सदस्य व सर्व ग्रामस्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत