Breaking News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधून समाज घडला - डॉ.मंगेश गुलवाडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मधून समाज घडला - डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती दिना निमित्त अभिवादन


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता च्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण केली.


 त्यामध्ये ग्रामोदय, राष्ट्रनिर्माण, अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक सुधारणांतून लोकशिक्षण अशा विविध सामाजिक प्रश्नांवर सुधारणा घडवून आणली त्यांचे हे कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन प्रसंगी महामंत्री ब्रिजभुषन पाझारे,रवींद्र गुरणुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारने,भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर,बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,महानगर सचिव राकेश बोमनवार,संतोष जिल्हेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत