Breaking News

सांडपाण्याच्या वादात दोन कुटुंबात हाणामारी.

मासळ येथे सांडपाण्याच्या वादात दोन कुटुंबात हाणामारी.


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,भंडारा : लाखांदूर:स्नानगृहाच्या पाण्यावरून दोन कुटुंबांत तुफान हाणामारी होण्याची घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले.

मासळ येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्यावरून वाद झाला .लोखंडी अवजाराने एकमेकावर हल्ला करण्यात आला श्रीकांत ईश्वर दिघोरे यांच्या तक्रारीवरून रामलाल दिघोरे 35 व प्रकाश दिघोरे 35 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तर रामलाल दिघोरे यांच्या तक्रारीवरून ईश्वर दिघोरे 50 आणि सुषमा दिघोरे 40 यांच्याविरोधात लाखांदूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर लाखांदूर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तपास लाखांदूर पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत