Breaking News

नेत्याची गुलामी करण्यापेक्षा जनतेची सेवा करा वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचे ब्रीदवाक्य:- जयेंद्र देशपांडे

नेत्याची गुलामी करण्यापेक्षा जनतेची सेवा करा वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचे ब्रीदवाक्य :- जयेंद्र देशपांडे



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेद्र मेश्राम,भंडारा ; दिनांक 10-4-2022 रोज रविवार ला सकाळी 9ः15 वाजता रामनवमी चे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुका येथील पिंपळगाव सडक येथे प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती आंदोलनाचे शाखा उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उद्घाटक मा.जयेंद्र देशपांडे आपल्या उद्घाटने भाषणातून सांगितले की महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा प्रहार जनशक्ती पक्ष जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्य करत आहे नेत्याची गुलामी करण्यापेक्षा जनतेची सेवा करा हे प्रहार चे संस्थापक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचे ब्रीदवाक्य असून त्यात खरे उतरण्यासाठी राहायचा सेवक सदैव प्रयत्नशील करण्यासाठी कार्य करत असे बोलले कार्यक्रमाच्या अध्यक्ष दीपक पाल जिल्हा संघटक प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा,प्रमुख उपस्थिती पटेल साहब प्रहार सहसचिव तालुका लाखनी, शालिकभाऊ बोरकर पाटील प्रहार तालुका उपाध्यक्ष लाखनी सोपानभाऊ झलके शाखाप्रमुख कनेरी दगडी, महेशभाऊ शेलोकर शाखाप्रमुख गोंडेगाव, यांच्या उपस्थितीमध्ये शाखा उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला शाखा पदाधिकार्‍यांची निवड शाखा प्रमुख आशिष तवाडे, शाखा उपप्रमुख प्रदीप वाघाये, शाखा सचिव वामन क्रमाने, संपर्क प्रमुख चंदूभाऊ कमाने, सदस्यगण खेमराज कोडापे, दिव्यांग विजय भाजीपाले, सुनीलजी शिवणकर, रणजीत ब्राह्मणकर, परिक्षित गेडाम, राकेश मेनपाले, प्रवीण शिंगाडे यांची निवड झाली तर सदर कार्यक्रमाला गावकरी जनता युवा वर्ग जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत