बल्लारपूर येथे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन
बल्लारपूर येथे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन
स्व.चांगुणाबाई वैद्यकिय मदतकक्ष व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : जनसेवा व रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानुन सातत्याने कार्य करणारे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार क्षेत्रामध्ये श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्व.चांगुणाबाई वैद्यकिय मदतकक्ष व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पीटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २ मे २०२२ ला सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत कॅन्सर तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी गोंडराजे बल्लाळशाह नाटयगृह कलामंदीरजवळ बल्लारपूर येथे होणार आहे. यावेळी शिबीरामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग व इतर कर्करोगांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येईल. तपासणीसाठी पुर्व नोंदणी भाजपा कार्यालय बल्लारपूर बसस्टॅन्डजवळ, भाजपा कार्यालय पोंभुर्णा व भाजपा कार्यालय मुल येथे करता येईल.
बल्लारपूर मतदार क्षेत्राअंतर्गत वेळोवेळी आयोग्य शिबीर, नेत्रचिकीत्सा शिबीर, रक्तदान शिबीर व इतर आजारांसंबंधी शिबीरे घेवून गोरगरीब जनतेला आरोग्य विषयक मदतीचा हात कायमच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या समाजकार्यातुन नागरिकांना मिळत आलेला आहे. बल्लारपूर स्थित कॅन्सर शिबीरातुन सर्वांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत