वनकुटे येथे मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर
वनकुटे येथे मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर
आरोग्य क्षेत्रात डॉक्टर रांधवण यांचे काम उत्तम : डॉ. दीपक आहेर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : तालुक्यातील वनकुटे येथे आदिवासी भागातील ग्रामस्थांसाठी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यावतीने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वनकुटे येथील आदिवासी समाजातील बांधवांनी या शिबीराचा लाभ घेतला. वनकुटे येथे सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. दीपक आहेर म्हणाले की डॉ. नितीन रांधवण यांचे आरोग्य क्षेत्रात काम हे चांगले असून वनकुटे सारख्या आदिवासी भागांमध्ये आरोग्यसेवेचे उत्तम काम ते करत आहेत. कोरोना काळातही त्यांनी अनेक सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीबांना आधार देण्यासाठी आम्ही काम करत असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असून आदिवासी ग्रामीण भागातील समाजाला मोफत व योग्य दरात उपचार मिळण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
वनकुटे येथे झालेल्या शिबिरासाठी सेवा सोसायटीचे चेअरमन काशिनाथ बुचुडे, डॉ. नितीन रांधवण, युवा नेते पवन खामकर, दीपक गुंजाळ, भानुदास गागरे, प्रकाश केदारी, यशवंत फपळे सर, डॉ. श्वेतांबरी आहेर, संतोष केदारी, सतीश साळवे, निवृत्ती साळवे, नारायण साळवे, अनिल विधाटे, रामदास गागरे, नारायण गागरे, साहेबराव काळे, ऋषीकेश गागरे, सारिका गुंड, बाळू वालझाडे, रवींद्र काळणर, बाळू गायकवाड, बाळासाहेब औटी, जयराम गागरे सर, अभिषेक उंडे, अजित गागरे, निलेश औटी, बंडू नेहे, आदी तसेच वनकुटे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत