टॅकर घोटाळ्यात बनावटीकरणाची वाढीव कलमे
टॅकर घोटाळ्यात बनावटीकरणाची वाढीव कलमे
आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, पारनेर : श्रीगोंदा तालुक्यातील टॅकर घोटाळा प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन वाढीव कलमांचा समावेश केला आहे.या घोटाळ्यातील साई सहारा कंपणीच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी अहमदनगर सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता .
या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींनी टँकरने पाणीपुरवठा करून शासकीय बीले सादर करताना बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आढळून आल्याचे सांगितले . आरोपींनी बनावट जीपीएस रिपोर्ट तयार करून बीले सादर केली . तर टॅकरने झालेला पाणीपुरवठा पडताळी करणाऱ्या गावपातळीवर वरील महीला समीतीच्या बोगस सह्या पोलिसांना तपासात आढळून आल्या . प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्र बसवने व त्याच्या अहवालानुसारच बिले अदा करण्याचे बंधन होते .
परंतु यासाठी बनावट रीपोर्ट तयार करण्याचे काम ठेकेदार असलेल्या साई सहारा कंपनीने केल्यामुळे आरोपींकडून जीपीएस यंत्र जप्त करण्यासाठी व बनावटगीरी कश्या प्रकारे केली याबाबतची माहिती मिळवण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी गरजेची असल्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली . तर तक्रारदारांनीच खोटी कागदपत्रे तयार करून आरोपींना या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकीलांनी केला . गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असुन अधिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीची घेण्याची गरज असल्याची बाजू सरकारी पक्षाने मांडली .
गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे . सखोल तपास झाल्यास मोठ्या घोटाळ्याची उकल होईल म्हणून आरोपींना अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात येवू नये असा युक्तीवाद मुळ तक्रारदार लोकजागृतीच्या वतीने करण्यात आला.आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुर्ण झाली असून सहा मे रोजी निकाल ठेवण्यात आला आहे . या जामीन अर्जाची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश माधुरी बरालीया यांच्या समोर झाली.
कर्जुले हर्यात बनावट सह्या ... !
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील महिलांच्या बनावट सह्या आढळून आल्याचे मुळ रेकॉर्ड पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले . त्यामुळे तपासात पुढे सर्व ठीकाणची पडताळी करावी लागेल अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली .

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत