Breaking News

अॅसीड हल्लातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

 

चकबोथली येथील 2017 ॲसिड प्रकरण

अॅसीड हल्लातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा 

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर : सण २०१७ मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील चकबोधली येथील अॅसीड हल्लातील आरोपीला सत्र न्यायालयाने दि . २१/०५/२०२२ रोजी जन्मठेपेची शिक्षा देवुन ३०,००० / - आर्थिक दंड ठोठावला आहे . 

दिनांक २ ९ / ११ / २०१७ रोजी चकबोथली येथील आरोपी अमोल किसन उर्फ कृष्णराव चौधरी , वय २२ वर्ष , याने फिर्यादीला शारीरीक सुखाची मागणी केली असता फिर्यादीने नकार दिला . परत पुन्हा आरोपीने मित्राचे मोबाईल वरुन फोन करुन शारीरीक सुख न दिल्यास मारण्याची धमकी दिली होती .

 29 नोव्हेंबर 2017 ला फिर्यादी हि आपल्या मुलांसोबत रात्रौ घरात झोपली असतांना आरोपीने घरात प्रवेश करुन फिर्यादी व तिच्या मुलाचे अंगावर ज्वलनशिल पदार्थ ( अॅसीड ) टाकुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला . फिर्यादी महिलेने सदर घटनेची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली होती.

तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम ३०७,३२६ ( अ ) , ४५० भादंवि सहकलम ३ ( १ ) , १२ अनु.जा.ज कायदा अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपी अमोल चौधरी यास अटक करण्यात आली होती . 

सदर प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अंतिम सुनावणीदरम्यान आरोपीस अॅसीड हल्लाच्या गुन्हयात दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा देवुन ३०,००० / - रु आर्थिक दंड ठोठावला आहे . सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी प्रशांत परदेशी यांनी केलेला असुन सध्याचे कोर्ट पैरवी अधिकारी पो हवा रामदास कोरे पो.स्टे . ब्रम्हपुरी यांनी दोषसिध्दीसाठी मोलाचे सहकार्य केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत