चंद्रपूरची भयानक कडक ऊन,
चंद्रपूरची ऊन
चंद्रपूरची भयानक कडक ऊन,
जसा लावारस सांडला आभाळातुन ..!
सकाळ होताच बरसतात ज्वाला सुर्यातुन,
जशी कानाला तापवीनारी एखादी बेसूर धून ..!!
गरम वाफा डोक्यावरच्या छतातुन,
घामाच्या धारा साऱ्या शरीरातून..!
पंखे ,कुलर ,एसी जातात उन्हापुढे त्रासून,
ऊन मात्र नाचत असते डोक्यावर बसून ..!!
रस्ते होतात सामसूम, झाडे जातात कोमेजुन,
घराबाहेर पडताच अंग जाते भाजुन .!
पशुपक्षीही व्याकुळ होतात पान्याला शोधून,
मग निजून जातात एखादी सावलीची जागा बघुन ..!!
अतृप्त तहान कोरडा घसा राहुन राहुन,
यंदा तरी पाऊस लवकर पडावा हिच इच्छा सर्व जनतेच्या मनातून ..!!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत